|| सदगुरू || | |
प. पू. श्री. माधवनाथ महाराज सांगवडेकर | प. पू. श्री. आनंदनाथ महाराज सांगवडेकर |
|| गुरुवर्य || | |
वैद्य समीर जमदग्नी (सर) | वैद्य अनिल बनसोडे (सर) |
प.पू.श्री. आनंदनाथ सांगवडेकर (महाराज),वैद्य समीर जमदग्नी (सर),वैद्य अनिल बनसोडे (सर) यांची श्री विश्वहंस आयुर्वेद ला सदिच्छा भेट..! | ||
सद्गुरू परंपरा – विश्वपंढरी संत परंपरेचे शक्तीपीठ. संत परंपराही आदिनाथ यांच्यापासून चालत आलेली आहे.
आदिनाथ ->मच्छिंद्रनाथ ->गोरक्षनाथ ->गहिनीनाथ ->निवृत्तीनाथ ->ज्ञानदेव ->देवनाथ ->चुडामुणी ->गुंडानाथ->
रामचंद्र वुटी महाराज ->महादेवनाथ ->रामचंद्र योगी महाराज ->विश्वनाथ महाराज->गोविंदनाथ ->माधवनाथ (दादा) महाराज सांगवडेकर ->आनंदनाथ महाराज सांगवडेकर.
नाथ परंपरा प्रवाहित करण्याचे काम प.पू.श्री. माधवनाथ महाराज सांगवडेकर यांनी केले आहे.या परंपरेचे कुलदैवत श्री क्षेत्र पैठण येथील श्री देवनाथ महाराजांची दुर्लक्षित समाधी शोधून दादा महाराजांनी ती प्रकाशात आणली.कदाचित हेच त्यांचे जीवित कार्य होते,दादा म्हणजे स्वच्छता ,सुगंध व साधना.प.पू.दादांनी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट स्थापन करून अध्यात्मासोबतच सामाजिक कार्याची जोड दिली.
तसेच श्री विश्वपंढरी प्रांगणात श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची स्थापना केली. सध्या प.पू.श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर या सर्व प्रांग्नाची जबाबदारी सांभाळत आहेत.दादांचे हेच कार्य अखंडपणे चालवत आहेत.अश्या परंपरेचे साधक होण्याचे भाग्य मला मिळाले यामुळे दादांचा खूप ऋणी आहे.अध्यात्म व आयुर्वेद साधना माझ्या कडून दादांनी अखंडपणे करून घ्यावेत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
आयुर्वेदातील गुरुवर्य (गुरुकुल परंपरा)
१.वैद्य समीर गोविंद जमदग्नी (सर)
श्री विश्वामृत आयुर्वेद चिकित्सालय ,पुणे.
३६ वर्षाहून हि अधिक काळ अखंडित सेवा.
२.वैद्य अनिल बाबुराव बनसोडे (सर)
श्री विश्वानंद आयुर्वेद चिकित्सालय हडपसर ,पुणे.
२३ वर्षाहून हि अधिक काळ कार्यरत.
आदरणीय सरांनी आयुर्वेदाला परत गतवैभव मिळवून दिले आहे.हजारो विद्यार्थी सरांकडे आयुवेदाचे शिक्षण घेऊन प्रॅक्टिस करत आहेत.अध्यात्म आणि आयुर्वेद साधना अखंडपणे त्यांची सुरु आहे. अशा गुरुवर्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला मिळाले व त्यांचा मी ऋणी आहे.