Panchkarm

||स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् |आतुरस्य व्याधिपरिमोक्ष||  (च. सु.)

--- श्री विश्वहंस आयुर्वेद चिकित्सालयाची वैशिष्टे ---

 

  • सर्व परीक्षणासह नाडी परीक्षणाद्वारे रुग्णांची तपासणी .
  • स्वच्छ व सुसज्ज असा पंचकर्म विभाग.
  • अतिशय शुद्ध व चांगल्या दर्जाची स्वतः बनवलेली आयुर्वेदिक औषधे.
  • सर्व आजारावर परिपूर्ण आयुर्वेद व पंचकर्म उपचार .
  • क्लिनिक मधूनच रुग्णांना औषधे दिली जातात.
  • आयुर्वेद औषधांबरोबर  योग व प्राणायाम यांचा सल्ला.
  • कॅन्सर ,एड्स ,मधुमेह ,रक्तदाब ,सल्ला व उपचार.


काय आहे आयुर्वेद ?
ayurved
स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजाराने ग्रस्त अशा रुग्णांना आजार मुक्त करणे असे अनमोल प्रयोजन असणारा वेद म्हणजे आयुर्वेद.....!


आयुर्वेद औषधी कशी असतात ?
tressआयुर्वेद औषधे ही प्रामुख्याने वनस्पती पासून तयार केलेली असतात.म्हणजेच ती अन्नासारखी असतात.त्यामध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल्स नसतात.त्यामुळे या औषधांना अॅलोपॅथिक औषधासारखे दुष्परिणाम असत नाहीत व ही औषधे शरीराला अपाय न करता काम करतात


पथ्य हा जाचक सल्ला आहे ?
पथ्य हा जाचक सल्ला नसून रुग्णाने घेतलेल्या औषधांचा त्याला जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा मार्ग आहे.खरे पाहता कसदार अन्नातूनच शरीराची निर्मिती होते. त्यामुळे औषधाने आजार बरा होतो व पथ्याने नवीन उत्तम प्रतीचे शरीर तयार होते.व पुन्हा औषध मूळावर कार्य करतात.त्यामुळे आजार लवकर बरा होतो.


आयुर्वेदिक औषधांचा गुण यायला वेळ लागतो ?
खरे पाहता हा समज चुकीचा आहे.गुण उशिरा येणे किंवा लवकर येणे हे आजार किती जुना आहे,याच्यावर ठरते.आयुर्वेदिक औषधे ही आजाराच्या मुळावर कार्य करतात.आजार जेवढा जुना तसा त्याचा कालावधी वाढतो.व आजार नवीन असेल तर त्याला लगेच गुण येतो.त्यामुळे वेळ लागला तर आजाराचा समुळ नायनाट होतो.


- पंचकर्म -

पंचकर्म म्हणजे काय ?
शरीर शुद्धी करणारी चिकित्सा म्हणजे पंचकर्म होय.बिघडलेले वात,पित्त व कफ हे दोष बाहेर टाकले जातात.पंचकर्म केल्याने आजार समुळ नष्ट होतो.हे शरीर शुद्ध करणारे पाच उपाय  आहेत.म्हणून त्यांना पंचकर्म म्हणतात.ही पंचकर्मे पुढील प्रमाणे आहेत.


1) वमन :-

vaman
शरीरात साठलेल्या कफाला उलटीच्या स्वरुपात बाहेर काढणे. विशेषतः कफाचे आजार वारंवार सर्दी,पडसे,खोकला,त्वचेचा विकार यावर चांगला उपयोग होतो.


2) विरेचन :-

virechan
शरीरात साठलेल्या पित्ताला शरीरातून बाहेर काढणे.विशेषतः पोटाच्या तक्रारी  आम्लपित्त, सोरायसिस , त्वचारोग,मलावरोधाची तक्रार ,दमा यात याचा चांगला उपयोग होतो.


3)बस्ती :-

basti

शरीरात साठणाया खराब वाताला औषधाचा एनिमा देऊन बाहेर काढणे, विशेषतःवाताचे आजार, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे आजार, सांधेदुखी, पाळीच्या तक्रारी, पुरुषामध्ये शुक्राणूंची तक्रारी, लैगिक समस्यांत याचा चांगला फायदा होतो.

बस्तीचे उपप्रकार :
१) कटीबस्ती     २) जानूबस्ती      ३) हृदबस्ती


४) रक्तमोक्षण :-

blood


शरीरात तयार होणारया खराब रक्ताला शरीराबाहेर काढणे.त्यासाठी जळुचा वापर करतात. त्वचाविकार, सोरीयासिस, त्वचा काळी पडणे यामध्ये चांगला उपयोग होतो.


५) नस्य :-

nasya


नाकात औषधे सोडले जाते. केस गळणे, पिकणे, उंची वाढवणे, डोके दुखणे, मान दुखणे, फिट्सयेणे यात नस्यचा चांगला  उपयोग होतो.


 

पंचकर्म उपचारपद्धती :-  स्नेहन व स्वेदन पूर्वकर्म तसेच शिरोधारा, अग्निकर्म, आदींचा उपयोग चिकित्सेत केला जातो.

 स्नेहन :-

snehan


औषधींनी तयार केलेले तूप, तेल अंगाला चोळून लावणे, याच्या उपयोगाने रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.स्नायूंची ताकद वाढते, थकवा दूर होऊन मानसिक ताण कमी होतो.शरीराची कांती सुधारून स्नायू पिळदार होतात.वात विकार, पॅरालिसीस, स्मृती कमी असणे,सायटिका,दृष्टी रोग, त्वचा रोग, सोरायसिस इत्यादिंसाठी हे उपयोक्त आहे.


स्वेदन :-

sweden-500x500


औषधीयुक्त काढ्याच्या वाफेने अंग शेकणे. याचा उपयोग वातविकार, सायटिका, पॅरालिसीस, संधिवात, मुळव्याध, फिशर, कंपवात, हातपाय आखडणे, स्थूलता, कंबर, पाठ, मान आखडणे, धनुर्वात यामध्ये उपयुक्त असतो.

 

शिरोधारा :-

shirodhara-Custom


औषधी सिद्ध तेल, तूप, ताक, यांची धार कपाळावर सोडणे. स्मृतिभ्रंश, निद्रानाश, मानसिक रोग,  अल्झायमर डिसीज, सिझोफ्रेनिया, फिट येणे, कफ विकार, वातविकार, दृष्टीमांद्य, डोके जड पडणे, एकाग्रता वाढविणे इत्यादिसाठी उपयुक्त.